बिग बॉस : परतलेल्या अरमानला पाहून तनिषा बेभान!, Armaan hugs, kisses Tanishaa after returning to the

बिग बॉस : परतलेल्या अरमानला पाहून तनिषा बेभान!

बिग बॉस : परतलेल्या अरमानला पाहून तनिषा बेभान!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता अरमान कोहलीनं ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा एन्ट्री घेतलीय. गायिका आणि मॉडेल सोफिया हयात हिनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानं अरमानला पोलिसांनी अटक केली होती.

घरात दाखल झाल्यानंतर संग्राम आणि अँन्डी अरमानचं हसतमुखानं आणि आनंदानं स्वागत केलं. तनिषाचा आनंद मात्र गगनात मावेनासा झाला... तनिषाला पाहिल्याबरोबर अरमाननं तनिषाला मिठी मारून उचलून घेतलं. अरमानची आतूरतेनं वाट पाहणाऱ्या तनिषानंही अरमानला किस करून आपण त्याला किती मिस केलं हे दाखवून दिलं.

त्यानंतर अरमान आणि तनिषा बोलत असताना अरमाननं आपल्या आई-वडिलांनी तनिषासाठी दिलेली प्रतिक्रिया तिच्याजवळ व्यक्त केली. ‘आईनं, उरलेल्या १२ दिवसांत तू एकदाही तनिषासोबत भांडण केलं तर घरी आल्यावर जोरदार थोबाडीत खाशील असं सांगितलंय... आणि वडिलांनी तनिषाला एकदा कपाळावर किस करून आय लव्ह यू असं’ म्हणायला सांगितलंय, असं तनिषासमोर म्हटलं. आपल्या वडिलांनी दिलेला मॅसेज तनिषापर्यंत पोहचवण्यासाठी अरमाननं तनिषाला कपाळावर ‘किस’ करून ‘आय लव्ह यू’देखील म्हटलं.

‘माझे वडिल संपूर्ण रात्रभर मी पोलीस स्टेशनमधून बाहेर निघावं म्हणून वाट पाहत बसले होते... त्यांनी पहिल्यांदाच मला आय लव्ह यू म्हटलं’ असंदेखील यावेळी अरमाननं म्हटलं. सोफियानं निर्माण केलेल्या प्रकरणाबद्दल यापुढे या घरात आपल्याला काहीही बोलायचं नसल्याचंही अरमाननं यावेळी म्हटलं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 19, 2013, 11:07


comments powered by Disqus