Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:50
www.24taas.com, झी मीडीया, मुंबईबिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला सदस्य आणि अरमान कोहलीचा जवळचा मित्र असलेला न्यूड योगा गुरू विवेक मिश्रा याने अरमान कोहलीबाबत काही धक्कादायक गुपीतं एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत उघड केली आहेत.
अरमानचे तनिषाशी असलेले संबंध खोटे आहेत, असे सांगून विवेक म्हणाला, मी जेव्हा घर सोडत होतो, तेव्हा अरमानने मला सांगितले की त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड तनियाला सांग की मी फक्त तिलाच प्रेम करतो. तनिषाशा सोबत जे काही चालले आहे ते काही खरे नाही आहे, असेही विवेकने मुलाखतीत म्हटले आहे.
अरमानची गर्लफ्रेंड आणि अरमान हे एकमेकांमध्ये खूप गुंतले आहेत. अरमानला तानियापासून मूल हवं आहे. पण तो जेव्हा संतापतो तेव्हा तो तिला मारहाण करतो. तो खूश असतो तेव्हा तो तिला प्रेम करतो आणि संतापतो तेव्हा तिला टॉर्चर करतो.
विवेक मिश्रा हा न्यूड योगा गुरू असून तो अरमान आणि तानिया यांचा जवळचा मित्र आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 13:50