Last Updated: Saturday, November 23, 2013, 09:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये सर्वात जास्त चर्चेत आणि विवादात असलेली जोडी म्हणजे अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी... बिग बॉसच्या घरात नवनवीन कारनामे रोजच होत असतात. नुकताच कुशाल टंडन या घरात परतलाय. कुशालसोबत घरातल्या मंडळींच्या कुटुंबाकडून काही गिफ्ट पाठवण्यात आले. त्यातलं विशेष असं गिफ्ट म्हणजे अरमानच्या आईनं आपल्या सूनेसाठी म्हणजे तनिषा मुखर्जीसाठी विशेष गिफ्ट पाठवलंय.
गिफ्ट मिळाल्यानं सर्वच जण आनंदात होते. एका इंटरटेंमेन्ट वेबसाईटमधील बातमीनुसार अरमानची आई निशी कोहलीनं कुशालसोबत एक विशेष मॅसेज पाठवला. त्या म्हणाल्या की “तनिषाला सांग की ती मला खूप आवडते, ती खूप गोड मुलगी आहे”. निशी कोहलीनं कुशालला हे सुद्धा सांगितलं की “जेव्हा तु तनिषाला भेटशील तेव्हा तिला आलिंगण देऊन माझ्यातर्फे किस कर”.
असं वाटतंय की, तनिषाच्या केअरिंग नेचरमुळं अरमानची आई खूपच प्रभावित झालेली आहे आणि ‘टॅन-मॅन’ अरमानची बायको म्हणून त्यांनी तनिषाचा स्वीकार केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 09:55