गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!`Bigg Boss 7`: Arman, Tanisha celebrate Holiday in Goa

गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!

गोव्यात अरमान आणि तनिषा एकत्र!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बिग बॉसच्या घरातील लव्हबर्ड्स म्हणून चर्चेत आलेल्या जोड्या गौहर आणि कुशाल यांच्यानंतर आता तनिषा आणि अरमान यांनीही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतला. मात्र यावेळी अरमान आणि तनिषा हे दोघंही एकटे नव्हते. त्यांच्या बरोबर तनिषची आई, अँडी आणि अँडीची आई देखील होते. त्यामुळं अरमान आणि तनिषाला एकमेकांना एकट्यात वेळ देता आला नाही.

बिग बॉसच्या घरात अरमान आणि तनिषा हे दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तसंच त्यांच्यात प्रेम संबंध असल्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार तनिषा, अरमान आणि अँडी यांनी लोणावळ्यामध्ये पार्टी केली आणि त्यानंतर ते गोव्याला निघून गेले.

अरमाननं म्हटलं की लोणावळ्याला जाऊन पार्टी करण्याचा प्लान हा अचानक करण्यात आला. या पार्टी करता तनिषाच्या आईनं म्हणजेच तनुजानं मटन, चिकन, मिठाई आणि प्लटम केक यावेळी मेजवाणीसाठी तयार केला होता. तसंच तनिषानं सांगितलं, आम्ही सर्वांनी खूप मजा केली आणि अरमान आल्यामुळं जास्तच मजा करु शकलो.

या दरम्यान तनिषाच्या आईनं देखील या सर्वांची चांगलीच मेहमान नवाजी केली. बिग बॉस ७च्या घरात असताना अरमान आणि तनिषामधील वाढती जवळीक तनुजाला खटकत होती. मात्र गोव्यातील पार्टीच्या या फोटोमध्ये तसं काहीही दिसलं नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 16:31


comments powered by Disqus