रागावलेला सलमान म्हणाला, बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका!‘Don’t waste your time watching ‘Bigg Boss’-Salman Khan

रागावलेला सलमान म्हणाला, बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका!

रागावलेला सलमान म्हणाला, बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

दबंग खान सलमान पुन्हा एकदा भडकलाय आणि तो एवढ्यावरच थांबला नाही तर आवडत नसेल तर तुम्ही बिग बॉस बघण्यात वेळ घालवू नका, असा सज्जड दमही त्यांना प्रेक्षकांना दिलाय.

बिग बॉस-७ चा होस्ट असलेल्या सलमान खानवर सध्या भेदभाव करत असल्याचा आरोप होतोय. तनिषा मुखर्जीच्या बाबतीत सलमान पक्षपात करत असून दुसरी स्पर्धक गौहर खानला निशाणा करत असल्याची चर्चा आहे.

सलमान खान आजकाल त्याचा चाहत्यांना नाराज करतोय. गेल्या काही आठवड्यापासून सलमान खान ट्विटरवर चाहत्यांची समजूत काढतोय. मात्र आता वैतागलेल्या सलमाननं, तुम्हाला वीकेंड एपिसोड पसंत नसेल, तर पाहूच नका, असं म्हटलंय. सलमानच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यावरच ही चर्चा रंगलीय.

बिग बॉसचा वीकेंड एपिसोड ज्यांना पसंत आलेला नाही, त्यांनी प्लीज आपला वेळ वाया घालवू नये, असं सलमाननं ट्वीट केलंय. याशिवाय तुमच्याजवळ इतर काही गोष्टी करण्यासाठी वेळ आहे. निवडणुका येत आहेत, तुम्ही मतदान करा, असंही सलमाननं म्हटलं.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 11, 2013, 16:54


comments powered by Disqus