बिग बॉस : इजाझ म्हणतो, नरेंद्र मोदी ‘चोर’!, bigg boss 7 : ijaz called narendra modi as chor

बिग बॉस : इजाझ म्हणतो, नरेंद्र मोदी ‘चोर’!

<B> बिग बॉस : इजाझ म्हणतो, नरेंद्र मोदी ‘चोर’! </b>

www.24taas.com, झी मीडिया, लोणावळी

‘बिग बॉस सिझन – ७’ अखेरच्या टप्प्यावर आलंय. पण, वाद काही या कार्यक्रमाची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. नुकत्याच झालेल्या एका भागात कार्यक्रमातील एक स्पर्धक इजाझ खान यानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ‘चोर’ म्हटलंय.

दरम्यान, इजाझ खान यानं नरेंद्र मोदींना चोर म्हटल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा राग अनावर झालाय. इजाझविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी लोणावळ्यातल्या बिग बॉसच्या घराबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी केली. ‘इजाझनं घराबाहेर येऊन या वक्तव्याबाबत माफी मागावी’ अशी मागणी यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची केली.

याअगोदर, सोफिया हयात हिनं अरमान कोहलीविरुद्ध पोलिसांत मारहाणीची तक्रार केल्यानं या घरातलं वादळं घराबाहेरही पडलेलं दिसलं होतं. त्यानंतर इजाझनं नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंही बाहेरचं वातावरण पुन्हा एकदा तापलं. त्यामुळे, यंदाच्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरापेक्षा बाहेरच जास्त वाद रंगलेले दिसत आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 21:51


comments powered by Disqus