सलमान-कुशालच्या वादात बीग बॉस..., Bigg Boss 7’: Kushal Tandon misrepresentation of Salman’s apology

सलमान-कुशालच्या वादात बीग बॉस `सलमानं`च!

सलमान-कुशालच्या वादात बीग बॉस `सलमानं`च!

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘बीग बॉस’ सीझन ७ घरात सुरू असलेल्या घडामोडींमुळे जितका चर्चेत आहे... तितकाच हा कार्यक्रम घराबाहेर घडणाऱ्या घडामोडींमुळेही चर्चेत आहे. घरात हाणामारी करून घराबाहेर पडलेला कुशाल टंगन जेव्हापासून घराबाहेर पडलाय, तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. काही वक्तव्यामुळे शोचा होस्ट सलमान खान आणि कुशालमध्ये चांगलाच वादंग निर्माण झालाय.

आता आपल्या वक्तव्याचा मीडियानं विपर्यास केला, असं कुशाल टंडनचं म्हणणं आहे. कुशालनं घराबाहेर पडल्यानंतर सलमान खाननं आपली माफी मागितली असं वक्तव्य कुशालनं केलं होतं. मागच्या विकन्डला होस्ट सलमान खाननं यावर आपली तीव्र नाराजी शो दरम्यान व्यक्त केली होती. बिग बॉसच्या घरात सध्या असलेले स्पर्धक तसंच प्रेक्षकांसमोर सलमाननं कुशालला त्याच्या या वक्तव्यावर चांगलंच फटकारलं होतं. त्यानंतर कुशालनं स्पष्टीकरण दिलंय.
एका बाजूला कुशाल पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असे आडाखे बांधले जात असतानाच कुशाल बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानं वैतागलाय.

‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास झाल्यानं मी खूप नाराज आहे. हे खरं आहे की सलमान खाननं माझी माफी मागितली पण ते केवळ मला उल्हास देण्यासाठी... शनिवारी झालेल्या भागात जेव्हा सलमान सरांनी मला तनिषासोबत माझं वागणं चुकीचं असल्याचं सांगितलं. माझं तिच्या वजनाबद्दल, करिअरबद्दल किंवा तिच्या बहिणीबद्दल अशा खाजगी गोष्टींबद्दल मी आमच्या भांडणादरम्यान केलेली वक्तव्य मी करायला नको होती. असं सलमाननं म्हटलं तेव्हा मी खूप नाराज झालो होतो... माझा चेहराही पडला आणि मी संपूर्ण एपिसोडमध्ये शांत होतो. तेव्हा सलमान सरांनी मला म्हटलं, की कुशाल तु माझ्या भावाप्रमाणे आहे... आणि मी जे काही म्हटलं त्यामुळे तुला वाईट वाटलं असेल तर मला माफ कर... आणि हेच मी सर्वांसमोर म्हटलं... पण, या वक्तव्याचा विपर्यास करून त्याला हायलाईट का केलं जातंय मला कळत नाही’ असं कुशालनं म्हटलंय. सलमानबद्दल मला काहीही तक्रार नाही तर आदरच आहे, असंही कुशालनं म्हटलंय.

‘मी सलमानबद्दल काही चुकीचं बोलणं शक्यच नाही कारण तो माझ्यासाठी एक प्रेरणा आहे माझा आयडॉल आहे... सलमानला पाहता पाहताच मी लहानाचा मोठा झालोय. कुशाल तुझ्यात मला एक स्टार दिसतोय आणि तुझं भविष्य चांगलंच असेल, हे सलमानचे शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत’ असंही कुशालनं म्हटलंय.

सलमाननंही ‘कुशालनं आपल्या वर्तवणुकीबद्दल माफी मागितली तर त्याच्या पुन्हा एकदा घरात प्रवेश करण्याबद्दल माझी काहीही हरकत नाही’ असं म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 09:42


comments powered by Disqus