बिग बॉस ७ : अरमान-तनिषात कडाक्याचं भBigg Boss 7: Now Armaan Kohli and Tanisha Mukherjee have a fight

बिग बॉस ७ : अरमान-तनिषात कडाक्याचं भांडण

बिग बॉस ७ : अरमान-तनिषात कडाक्याचं भांडण

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘बिग बॉस’चं पर्व चांगलंच गाजतंय ते सध्या घरात सुरु असलेल्या ‘लव्ह स्टोरिज’मुळे... कुशाल टंडन -गौहर खान तसंच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी या जोड्यांनी या भागात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलंय. सध्या कुशाल टंडन घर सोडून निघून गेलाय.... गौहरनंही त्याच्यासोबत घर सोडलं होतं पण तीला पुन्हा बीग बॉसच्या घरात एन्ट्री मिळालाय... आणि तिला अजूनही कुशाल पुन्हा घरात परतेल, अशी आशा आहे.

या लव्ह स्टोरिजमधला एक ट्विस्ट म्हणजे, नुकतंच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांचं घरातील एक सदस्य एजाझ खानवरून चांगलंच जुंपलं. एजाझला बीग बॉसच्या घरात नुकतीच एन्ट्री मिळालीय. घरात प्रवेश केल्यानंतर एजाझनं लगेचच सगळया मुलींसोबत फ्लर्टिंग सुरू केलं. यामध्ये ‘निल अॅन्ड निकी’ची अभिनेत्री तनिषा मुखर्जीचाही समावेश होता.

याच गोष्टीबद्दल बोलताना अरमाननं पुन्हा एकदा आपलं भान हरवलं. एजाझला टाळण्यासाठी तनिषा काहीच करत नसल्याची तक्रार त्यानं तनिषाकडे केली तसंच एजाझला थोडं लांबच ठेवण्याचा सल्लाही त्यानं तिला दिला. एजाझसोबत जवळिक तनिषा नसल्याचंही त्यानं तिला सांगितलं. त्यामुळे तनिषा मात्र चांगलीच भडकली. ‘केवळ रात्री मी त्याच्याशी बोलते किंवा त्याला स्मितहास्या देते किंवा हसते, म्हणजे मी त्याच्यावर भाळलेय असा अर्थ होत नाही’ असं त्यानंतर चिडलेल्या तनिषानं उत्तर दिलं.

त्यानंतर काही वेळानं तनिषाची माफी मागितली मात्र एव्हानं अरमानच्या अशा बोलण्यामुळे आपण खूप दुखावलो असल्याचं तनिषानं म्हटलं. पण, या सर्व प्रकारात अनेकांना टीव्हीवरच कुणाच्या तरी ‘जळण्याचा’ चांगलाच वास आला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 2, 2013, 21:13


comments powered by Disqus