Last Updated: Saturday, December 28, 2013, 18:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई‘बिग बॉस-७’चा ग्रँड फिनाले प्रदर्शित होण्यापूर्वीच बिग बॉसचा आधीचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजननं हा सिझन कोण जिंकणार याबाबत ट्वीट केलंय.
राहुल आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, “मला १०० टक्के माहिती आहे की गौहर खानच बिग बॉस-७ ची विजेती ठरेल. अनेक अफवांमध्ये रंगलेलं पण प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणाऱ्या बिग बॉसचा विनर ठरायला काही तासच उरले आहेत. फायनल फोर स्पर्धक एजाज खान, तनिषा मुखर्जी, मॉडेल-अभिनेता गौहर खान आणि खेळाडू संग्राम सिंग आहेत.”
राहुल महाजन हा वादग्रस्त ठरलेला बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा स्पर्धक आहे. त्याचे वडील प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर तो प्रकाशात आला.
राहुल महाजनच्या या ट्वीटवर आणखी एक वादग्रस्त बिग बॉसचा स्पर्धक असलेल्या कमाल खान यानंही ट्वीट करत राहुलच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शविला.
कमाल खान म्हणतो, “गौहर खान बिग बॉस-७ची विजेती म्हणून घोषित झालीय. शूटींग अजूनही सुरू आहे. मात्र ती बाय हूक ऑर क्रुक तिच जिंकेल. अभिनंदन खान साहिबा.”
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 28, 2013, 18:17