`बिग बॉस फिनाले` अगोदरच व्हीजे अँन्डी घराबाहेर!, `Bigg Boss 7`: VJ Andy bids adieu to the s

`बिग बॉस फिनाले` अगोदरच व्हीजे अँन्डी घराबाहेर!

`बिग बॉस फिनाले` अगोदरच व्हीजे अँन्डी घराबाहेर!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

बिग बॉस सिझन-७ मधून ग्रँड फिनालेच्या अगोदरच व्हीजे अँन्डी बाहेर पडलाय. अँन्डीच्या अचानक कार्यक्रमाबाहेर पडल्यानं अनेकांना धक्का बसलाय. कारण, अँन्डी याला विजेतेपदाचा दमदार दावेदार समजलं जात होतं.

बिग बॉसचा यंदाचा सिझन अगदी शेवटच्या टप्प्यावर आला असताना आठवड्याच्या मध्यावर करण्यात आलेल्या एव्हिक्शनमध्ये व्ही जे अँन्डीला घराबाहेर पडावं लागलंय. अँन्डीचं खरं नाव आनंद विजय कुमार... घरातल्या सदस्यांना आणि प्रेक्षकांना हसवत ठेवण्याचं कसब त्यानं बिग बॉसच्या घरातील अनेक वादळांनंतरही कायम ठेवलं होतं.

अँन्डी विजेता होईल, असं बिग बॉसच्या सेटवर आलेल्या अनेक सेलिब्रिटिंनाही वाटत होतं. मागच्या पर्वात या कार्यक्रमात प्रेक्षकांसमोर आलेला कमाल खान तर अँन्डीच विजेता होईल, या मतावर ठाम होता.

बिग बॉसचं हे पर्व संपायला केवळ तीन दिवस बाकी असतानाच अँन्डी बाहेर पडावं लागल्यानं त्याचे चाहते मात्र नाराज झालेत. ‘बिग बॉस ग्रँड फिनाले’मध्ये आता दिसणार आहेत केवळ गौहर खान, तनिषा मुखर्जी, एजाझ आणि संग्राम सिंग.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 15:39


comments powered by Disqus