बिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!‘Bigg Boss 7’: When Tanishaa Mukerji proposed Armaan Kohli

बिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!

बिग बॉस-७: तनिषानं अरमानला केलं प्रपोज!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन किस्से घडत असतात आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे ती तनिषा आणि अरमानची जोडी. बिग बॉस-७ या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांना सुद्धा आता हे कळून चुकलंय की अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे.

बिग बॉसच्या घरात असलेली सोफिया हयातसह सर्वच सदस्य मानतात की जे अरमान म्हणतो तेच तनिषा करते. तनिषानं अरमानला आपल्या मनातलं प्रेम हे इशाऱ्यांमध्येच सांगितलं. बघूया ते कसं...

जेव्हा बिग बॉसच्या घरात एजाज खानची वाईल्ड कार्ड एंट्री झाली, तेव्हा अरमानला वाटलं तनिषा एजाजच्या जवळ जातेय. त्यावर अरमाननं तनिषाला आपली त्याबाबतची नाराजी दर्शवली. तनिषानंही अरमानचा अपसेट झालेला मूड बघून एजाजपासून दूर होणंच पत्करलं.

या प्रकारानंतरच तनिषानं अप्रत्यक्षपणे अरमानला प्रपोज केलं. मग जेव्हा अरमाननं तिला विचारलं की तु माझ्यावर किती प्रेम करते, तेव्हा तनिषा लाजली आणि काहीच बोलली नाही. तिचा चेहरा लाजेनं लालेलाल झाला होता. बिग बॉसच्या घरात त्यांची जवळीक नेहमीच चर्चेचा विषय ठरतेय.

बिग बॉसच्या याच सिझनमध्ये यापूर्वी कुशाल टंडन आणि गौहर खानची जोडी चर्चेत होती. मात्र कुशाल तर आता घरातून बाहेर पडलाय. त्यामुळं गौहरजवळ आता फक्त त्याच्या आठवणी आहेत. गौहरला कुशालनं घरात परत यावं असंच वाटतं, त्यानं कोणतीही घोडचुक केली नव्हती असं तिला वाटतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013, 11:22


comments powered by Disqus