`बिग बॉस`मध्ये निर्माण नवा `लव्ह ट्रँगल`, `Bigg Boss` dhamakas!`

`बिग बॉस`मध्ये निर्माण नवा `लव्ह ट्रँगल`

`बिग बॉस`मध्ये निर्माण नवा `लव्ह ट्रँगल`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सध्या चर्चेत असलेल्या ‘बिग बॉस ७’ या रिअॅलिटी शोमध्ये आणखी एक नविन ट्विस्ट येणार आहे. मॉडेल ‘कँडी बरार’ आणि अभिनेता ‘एजाज खान’ लवकरचं बिग बॉस च्या घरात वाइल्ड कार्ड द्वारे प्रवेश घेणार आहेत.

सध्या घरातील कॅप्टन कुशाल आहे. ‘कॅंडी बरार’ ही त्याची एक्स गर्लफ्रेन्ड आहे. गौहर आणि कुशल यांच्यातील केमिस्ट्रीने ‘बिग बॉस’ला खुप टीआरपी मिळवून दिला आहे, त्यात बरारची एन्ट्री म्हणजे फूल टू धिंगाणा...

नुकतंच घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धक विवेक मिश्राने घरात असताना बरारची इमेज खराब केली असल्याचा आरोप कँडीने केला आहे. प्रत्यक्षात आपली इमेज कशी आहे, हे ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांना दाखवून देण्यासाठी तिने या घरात येण्याचा निर्णय घेतला आहे. कुशाल आणि गौहर यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे ती या कार्यक्रमात सहभागी होत नसल्याचं तिने सांगितलं.

“कुशाल जर गौहरसोबत रिलेशनशिपबद्दल गांभिर्याने विचार करत असेल, तर मला त्यात आनंदच आहे. गौहर खुप छान मुलगी आहे. कुशाल आणि मी आजही खूप छान फ्रेंड्स आहोत.” असं ग्लॅडरॅग्स २००४ ची विजेती ठरलेल्या कँडी बरारने स्पष्टं केलं.

‘बिग बॉस’च्या घरातील ‘लव बर्ड्स’ मध्ये, कँडी च्या येण्याने काय परिणाम घडणार ? हे पाहणं नक्कीचं इन्टरेस्टिंग असणार आहे...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 27, 2013, 23:43


comments powered by Disqus