`चुटकी`ला टक्कर देण्यासाठी `बुआ`चं लग्न!, `buaa` getting married in comedy nights

`चुटकी`ला टक्कर देण्यासाठी `बुआ`चं लग्न!

`चुटकी`ला टक्कर देण्यासाठी `बुआ`चं लग्न!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`कलर्स`वर प्रसारित होणाऱ्या `कॉमेडी नाईटस् विथ कपिल`ला या आठवड्यापासून टक्कर देणार आहे चुटकीचा `मॅड इन इंडिया`... यासाठी कपिलनं मात्र `गुत्थी`चं पात्र सोडून चुटकी बनलेल्या सुनील ग्रोवरला मात देण्याचा चंग बांधलाय. यासाठी त्यानं आपल्या कार्यक्रमात काही बदलही घडवून आणलेत.

`कॉमेडी नाईट`मधून बाहेर पडून सुनील ग्रोवरनं `मॅन इन इंडिया` या नवीन कार्यक्रमाची योजना आखलीय. त्यामुळे `कॉमेडी नाइटस`च्या आजवरच्या लोकप्रियतेच्या आलेखावर थोडाफार परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतीय. तसंच कपिल आणि सुनीलनं कितीही नाही म्हटलं तरी प्रेक्षक या दोघांची तुलना मात्र नक्की करणार, याची कल्पना दोघांनाही आहे.

त्यामुळेच कपिलनं आपल्या शोमध्ये चक्क `बुआ`च्या लग्नाचा चंग बांधलाय. लग्नासाठी आतूर झालेल्या `बुआ`चं म्हणजेच उपासनाचं अखेर लग्न होणार आहे. तिच्या या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत `शादी के साईट इफेक्टस` सांगणारे फरहान अख्तर आणि विद्या बालन... त्यामुळे कपिलच्या कार्यक्रमात या आठवड्यात `बुआ`चीच जादू दिसणार आहे.

सोबतच, कपिलनं या शोमध्ये `गोल्डन` नावाच्या आणखी एका कॅरेक्टरचा समावेश केलाय. `गोल्डन`चं पात्र कपिलच्या शोमधलाच एक कॉमेडियन असलेला रज्जाक खान निभावणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 18:09


comments powered by Disqus