Last Updated: Wednesday, January 22, 2014, 12:46
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता सोहेल खानच्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल)च्या सामन्यांसाठी कॉमेडी किंग कपिल शर्मा होस्ट करणार आहे. मात्र, त्याचे मानधन ऐकूण आश्चर्य व्यक्त कराल. अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये काम करताना मानधन घेत नाहीत, त्यापेक्षीही जास्त मानधन कपिल घेणार आहे. होस्टच्या बदल्यात तो सव्वा कोटी रूपये मानधन घेणार आहे.
सूत्रांकडून सांगण्यात आले की, कपिल सध्या कॉमेडी शो चांगला चालत आहे. त्याची सध्या क्रेझ आहे. त्यामुळे त्यांने मोठ्या मानधनाची मागणी केली. अन्य कॉमेडी कलाकारांपेक्षा कपिलचे मानधन सर्वाधिक आहे. कॉमेडी नाईटला टक्कर गुत्थीची मेड इन इंडिया या कार्यक्रमाची आहे.
सेलिब्रिटी क्रिकेट लीग २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनच्यावेळी हनी सिंग परफॉर्म करणार आहे. यावेळी रणदीप हुडा, आयुष्मान खुराना, अरमान कोहली, समीर कोचर, अली जाफर आणि जाएद खान मैदानावर खेळणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, January 22, 2014, 12:46