Last Updated: Friday, November 15, 2013, 18:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सध्या ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ शो मधून गुत्थी बाहेर जाणार की नाही? ही चर्चा जोरदार चालू आहे. या शोचा सुत्रधार कपिल शर्माने शोमधून गुत्थी बाहेर जाण्याबाबतचे मौन आता तोडले आहे. कपिलने आपल्या सहकलाकार सुनील ग्रोवरसाठी ट्विटरवर ट्विट केलं की, “मला सुनील आणि गुत्थीसाठी आपुलकी आहे. मी नेहमीच कार्यक्रमात त्यांचे स्वागत केले आहे. मी त्यांना फक्त शिफारस करू शकतो, परंतु मी त्यांना आग्रह करू शकत नाही. काही हो मला त्याच्यासाठी आपुलकी आणि आदर आहे. परंतु कृपया याबाबत अफवा पसरवू नये.
‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ शोमधून गुत्थी अर्थातच सुनील ग्रोवर नाही दिसणार आणि शोमधून बाहेर होण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. कलर्स या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा निर्माता आणि सादरकर्ता कपिल शर्माचे हास्य विनोद, गंमतीदार मार्मिक विनोदी उत्तरं आणि लोकांना भरपूर हसवणारी दादी, बुवा, पलक आणि गुत्थी अशा पात्रांमुळे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला.
‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ हा शो भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वोत्तम विनोदी शोपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आलेली की गुत्थी म्हणजे सुनील ग्रोवरने स्वत:ला शोमधून वेगळ केलं आहे. सुनील या शोमधून का बाहेर पडला, याचे कारण मात्र स्पष्ट झाले नव्हते. सुनील ग्रोवरने यावर काही एक विधान केले नव्हते आणि कलर्स वाहिनीवरील अधिकाऱ्यांनी देखिल याबाबत काही सांगितले नाही. परंतु आता गुत्थी हे पात्र शोमध्ये दिसणार नाही हे ऐकून गुत्थीच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
हे ही सांगितले जातं की, कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर मधील मतभेदचं, सुनिलचं शो सोडून जाण्याच कारण आहे. लोकांचं हेही म्हण आहे की, कपिल म्हणजे बिट्टूच्या कॉंमेडीवर गुत्थी अर्थातच सुनील ग्रोवरचे पंच भारी पडत होते. आणि कपिलला असं व्हाव हे मान्य नाही, त्यामुळे गुत्थीचं एक्झीट झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 15, 2013, 18:36