गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका, Cute children bear the `Khan` family trad

गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका

गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.

४० वर्षांची मलायका ही अभिनेता-निर्माता अरबाज खानची पत्नी असून त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. तसेच सोहेलचे ही सीमा सचदेवशी १९९८ मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांना निर्वाण आणि योहान नावाची दोन मुले आहेत.

मात्र सलमानचं लग्न जेव्हा कधी ही होईल तेव्हा त्याला ही निश्चितच सुंदर मुलं होतील, असा विश्वास मलायकाने दाखवला आहे. मलायकाला खान भावंडांच्या वेगळेपणाबाबत विचारले असता मलायकाने म्हणाली की, त्यांच्यात सुंदर मुलांना जन्म देण्याची खासियत आहे.

मलायका अरोरा ही सध्या `इंडियाज गॉट टॅलेन्ट` शोची परीक्षक आहे. तसेच या शोमध्ये वय वर्ष ३ पासून ते ८० वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींचे टॅलेन्ट पाहता येणार आहे. `इंडियाज गॉट टॅलेन्ट’ या शोमध्ये अदभूत टॅलेन्ट असल्याचे मलायकाने सांगितले.

इंडियाज गॉट टॅलेन्ट शो बद्दल बोलतांना मलायका म्हणाली, या वर्षीच्या शोमध्ये अविश्वसनीय आणि अदभूत असं मनोरंजन बघायला मिळणार आहे.

मलायका बरोबर या शोमध्ये करण जोहर आणि किरण राव ही परीक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. हा शो कलर्स वाहिनीवर ११ जानेवारीपासून शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014, 14:50


comments powered by Disqus