‘अरमान-तनिषाचा रोमांन्स केवळ दिखावा’, `Desires - tanisaca romannsa only cosmetic "

‘अरमान-तनिषाचा रोमांन्स... केवळ दिखावा’

‘अरमान-तनिषाचा रोमांन्स... केवळ दिखावा’
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप प्रत्यारोपाचे कामही जोरात चालू आहे. याच सीझनमध्ये सहभागी झालेली ब्रिटीश अभिनेत्री सोफिया हयात ही आता बीग बॉसच्या घरातून बाहेर पडलीय त्यानंतर मात्र तिने या शोबद्दल अनेक आणि घरातल्या सदस्यांबद्दल अनेक बॉम्ब टाकलेत. ‘बीग बॉस’चं घर बाहेरुन दिसतं तसं आतून मात्र अजिबात नाही, असा खुलासा तिनं केलाय.

सोफियाच्या म्हणण्यानुसार, गौहर खान आणि कुशाल टंडन यांच्यामधला रोमांस हा वास्तविक आहे. परंतु, अरमान आणि तनिषाचा रोमांस मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. अरमान आणि तनिषा यांच्यामध्ये सुरू असलेला प्रेमाचा खेळ खोटा आहे ते नाटक करत आहेत... आणि हा खोटेपणा अरमानच्या बाजुनं आहे. तो तनिषावर प्रेम करत नाही तर तो केवळ तनिषाचा वापर करतोय. या शोमध्ये टिकून राहण्यासाठी तो त्याची बाहेर ‘गर्लफ्रेंड’ असतानाही तनिषावर प्रेमाचं नाटक करतोय आणि स्वत:ला या शोमध्ये टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, असं सोफियानं एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

यावेळी सोफियाने संग्राम, गौहर आणि कुशालची खूप स्तुती केली. त्यांनी बीग बॉसच्या घरात मला खूप साथ दिली. बीग बॉसचं हे पर्व गौहरनं जिकावं, अशी इच्छाही तीनं यावेळी व्यक्त केलीय. बीग बॉसच्या घरात सोफियाचे संबंध अरमान, तनिषा, एजाज खान यांच्याबरोबर काही खास नव्हते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013, 18:20


comments powered by Disqus