Last Updated: Sunday, November 24, 2013, 18:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘बीग बॉस सीझन ७’मधून सलमानची लाडकी स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी एली अवराम घरातून बाहेर पडलीय. एलीच्या घराबाहेर जाण्यानं अनेकांना आश्चर्य वाटतंय.
एली ही जिंकण्याची शक्यता असलेल्या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक मानली जात होती. घरातील वाद-विवादांपासून दूर राहणारी एली घरातल्या सगळ्यांनाच जवळची वाटत होती... त्यामुळे तिच्या घरातून बाहेर जाण्यानं घरातील सदस्यांनाही चांगलाच धक्का बसलाय. प्रेक्षकांनी दिलेल्या कौलानुसार, एली अबरामला घरातून बाहेर पडावं लागलंय.
या आठवड्यात एलीशिवाय तनिषा, एजाज आणि सोफिया हेदेखील घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. पण, दर्शकांचे कमी वोटस् मिळाल्यानं एलीला घरातून बाहेर निघावं लागलंय.
एली ही सलमान खानची आवडती स्पर्धक होती. सलमाननं अनेकदा या विदेशी अभिनेत्रीला ‘पाच वर्षांपूर्वीची कतरिना’ म्हणून संबोधलं होतं... तसंच अनेकदा कतरिनाशी तिची तुलनाही केली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 24, 2013, 18:50