`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!, First crorepati in `KBC7`

`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!

`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.

ताज मोहम्मद रंगरेज हे उदयपूरचे रहिवासी आहेत. ते व्यवसायाने इतिहासाचे शिक्षक आहेत. सातव्या सिझनला सुरूवात होऊन काही भागच प्रसारित झाले असताना ताज मोहम्मद रंगरेज यांनी १ कोटी रुपयांची बाजी मारली आहे. आपण एक कोटी रुपये जिंकलो आहोत, यावर त्यांचा स्वतःचाही विश्वास बसत नाहीये. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर याबद्दल माहिती दिली आहे. ताज मोहम्मद रंगरेज यंचा भाग १५ सप्टेंबरला दाखवण्यात येणार असल्याचं अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे.

एक कोटी रुपयांसाठी कुठला प्रश्न विचारण्यात आला होता, हे रंगरेज यांनी सांगितलं नाही. मात्र १ कोटीचा प्रश्न विचारेपर्यंत काही लाईफलाईन बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या पैशातून ताज मोहम्माद आपल्या अंध मुलीवर उपचार करणार आहेत. तसंच एक घरही खरेदी करण्याचा त्यांचा बेत आहे. याशिवाय समाजाप्रती असणारं आपलं कर्तव्य विचारात घेऊन ताज मोहम्मद २ अनाथ मुलींची लग्न लावणार आहेत आणि ३ उपेक्षित समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देणार आहेत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 8, 2013, 15:48


comments powered by Disqus