`बिग बॉस`मध्ये... जगातील सर्वात छोटी महिला, jyoti amge in big boss season 6

`बिग बॉस`मध्ये... जगातील सर्वात छोटी महिला

`बिग बॉस`मध्ये... जगातील सर्वात छोटी महिला
www.24taas.com, मुंबई

कलर्स चॅनलवर सध्या सुरू असलेला ‘बिग बॉस सीझन-६’ मध्ये आता आणखी एक नवी एन्ट्री होणार आहे. या घरात आता प्रवेश करणार आहे... जगातील सर्वात छोटी महिला. फॅशन स्टायलिस्ट इमाम सिद्दीकी याला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर बिग बॉसच्या घरात एका नव्या पाहुण्याला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार आहे.

जगातील सर्वात कमी उंचीची मुलगी म्हणून प्रसिद्ध असलेली नागपूरची ज्योती आमगे आता आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. १८ वर्षीय ज्योतीच्या नावाचा समावेश जगातील सर्वात कमी उंचीची मुलगी म्हणून गिनिज ‘बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आहे. ज्योतीची उंची केवळ १ फूट ११ इंच एवढी आहे. माहितीनुसार, ज्योती आमगे हिच्यासोबत छोट्या पडद्यावरचा अभिनेता संतोश शुक्ला यालाही ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्रीचा जॅकपॉट लागणार आहे. येत्या गुरुवारी, २२ नोव्हेंबर रोजी हे दोघेही बिग बॉसच्या घरात प्रवेश करतील अशी माहिती मिळतेय.

ज्योती हिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा आहे आणि बिग बॉसमध्ये येणं म्हणजे तिच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारी एक सिडी म्हणून ती या कार्यक्रमाकडे पाहतेय.

First Published: Wednesday, November 21, 2012, 19:29


comments powered by Disqus