अंतराळात हनीमूनचा बेत

अंतराळात हनीमूनचा बेत

अंतराळात हनीमूनचा बेत
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

रॅपर कान्ये वेस्ट आपली वागदत्त वधू किम करदाशियां सोबत अंतराळात हनीमून साजरा करण्याच्या तयारीत आहे. कॉन्टॅक्ट म्यूझिकने दिेलेल्या बातमीनुसार बाउंड २ ने चर्चित आलेल्या गायकाला अंतराळाचं भारी वेड आहे, म्हणून त्याने रियलिटी टीव्ही स्टारला शून्य गुरूत्वाकर्षणात चालण्यास राजी केलं आहे.

कान्येला अंतराळ विज्ञान आणि सायन्स फिक्शनविषयी आवड आहे, त्याने अंतराळ थीमविषयी अनेक व्हिडीओही तयार केले आहेत. कान्ये यांनी अंतराळ इंजीनियरिंगचंही प्रशिक्षण घेतलं आहे. मात्र कान्ये आता अंतराळात हनीमून करण्याच्या प्रयत्नात आहे.

किम मात्र पहिल्यांदा यावर तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी कान्येने करदाशियांला अनेक वेळा सांगितलं, तसेच असंही सांगितलं जात आहे की, ही सफर रियलिटी शो म्हणूनही दाखवण्याचा प्रयत्न आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 13, 2014, 21:40


comments powered by Disqus