कॉमिडी किंग कपिल प्रीतीच्या प्रेमात... लवकरच विवाहबद्ध? Revealed: Kapil Sharma is dating 'Comedy Nig

कॉमिडी किंग कपिल प्रीतीच्या प्रेमात... लवकरच विवाहबद्ध?

कॉमिडी किंग कपिल प्रीतीच्या प्रेमात... लवकरच विवाहबद्ध?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमाचं सूत्रसंचालक कपिल शर्मा हा चक्क प्रेमात पडला आहे. तो लवकरच त्याच्या प्रेयसीबरोबर लग्न करण्याची शक्यता आहे.

नेहमीच कपिलनं आपल्या खाजगी जीवनाबद्दल बोलणं टाळलं. पण आता तो त्याच्याच शोमधल्या क्रिएटिव्ह दिग्दर्शक असलेल्या प्रीती सिमोसच्या बरोबर डेटिंग करतोय. त्याच्या जवळच्या लोकांनी म्हणणं आहे की, कपिल सीरियस डेटिंग करतोय. तसंच प्रीती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अधिक वेळापासून आहे. त्यामुळं कपिल आणि प्रीती कॉमिडी सर्कसच्या दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर त्यांची जवळीक ही आणखीनच वाढत गेली.

कॉमिडी सर्कस या शोच्या दरम्यान दोघंही एकमेकांच्या जास्त जवळ आले. त्यामुळं त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या दोघांनी मिळून ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा शो सुरू केला. काही दिवसांपूर्वी प्रीती बरोबर कपिलची डेटिंगच्या बातमीला कपिलनं मान्य केलं नाही. त्यानं सांगितलं की, आम्ही चांगले मित्र आहोत आमच्यात असं काहीही नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 17:06


comments powered by Disqus