कतरीना ‘वहिनी’?... लाडक्या बेबोचे काकांनी खेचले कान!, Katrina `vahini`? ... Ladakya Bebo Kaka hit th

कतरीना ‘वहिनी’?... लाडक्या बेबोचे काकांनी खेचले कान!

कतरीना ‘वहिनी’?... लाडक्या बेबोचे काकांनी खेचले कान!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

सध्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असलेली बॉलिवूडची सुपर हीट जोडी म्हणून ओळखली जाणारी रणबीर आणि कतरीना पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती करीना कपूरच्या कतरीनाला ‘वहिनी’ म्हणून संबोधण्यानं... पण, या तोंडघेवडेपणामुळे कपूर खानदानाच्या लाडक्या बेबोवर रणबीरचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर प्रचंड संतापलेत...

करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करीना कपूर आणि रणबीर कपूर ही भावा-बहिणीची जोडी एकत्रित उपस्थित होती. याच शोमध्ये करीनाने कतरीनाला ‘वहिनी’ म्हणून संबोधलं. म्हणजेच, कतरिना ही रणबीर कपूरची होणारी पत्नी असल्याचं करीनानं डिक्लेअर केलं... आणि त्यामुळेच त्यामुळे ऋषी कपूर यांचा राग अनावर झालाय.

बेबोनं कतरिनाला ‘वहिणी’ म्हटलेलं तिच्या काकांना म्हणजेच ऋषी कपूर यांना अजिबात पचनी पडलेलं नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रणबीर आणि कतरीना यांच्यात केवळ मैत्री आहे... कतरीना ही रणबीरची अतिशय जवळची मैत्रिण आहे, अशा शब्दांत ऋषी कपूर यांनी करीनाला खडसावलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013, 17:20


comments powered by Disqus