‘सन्मित कौर’ बनली पाच कोटींची मालकीण! , kbc season six winner sanmeet kaur

‘सन्मित कौर’ बनली पाच कोटींची मालकीण!

‘सन्मित कौर’ बनली पाच कोटींची मालकीण!
www.24taas.com, मुंबई

कौन बनेगा करोडपती... १५ प्रश्नांची उत्तरं द्या आणि पाच कोटी जिंका... ‘बीग बी’सोबत हा खेळ खेळण्याची मजा काही औरच... आणि या खेळात जर सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन खरोखरच पाच कोटी हातात पडले तर... कल्पनाही सुखावह वाटतेय ना! पण, हे प्रत्यक्षात पुन्हा एकदा घडलंय. यंदाच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या सहाव्या सीझनमध्ये मुंबईच्या सन्मित कौर सहानी या ३७ वर्षीय महिलेनं हा अनुभव प्रत्यक्षात घेतलाय. पाच करोड रुपये जिंकणारी सन्मित ही पहिलीच पहिला ठरलीय.

मराठमोळ्या हर्षवर्धनने पहिल्यांदा कौन बनेगा करोडपतीमध्ये आपला नावाचा झेंडा रोवला होता तो एक कोटी रुपये जिंकून... त्यानंतर आणखी काही जणांनीही एक कोटी जिंकले. झारखंडची राहत तस्लिमही त्यापैकीच एक.... त्यानंतर बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील सुशील कुमारने पाच कोटी जिंकले होते... आणि आता सन्मित...

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सन्मित अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होती; परंतू सहाव्या सीझनमध्ये तिला ही संधी मिळाली आणि तिनं या संधीचं सोनं केलं. सन्मित बारावीपर्यंत शिकलेली असून घरीच शिकवण्या घेते. वाचनाची आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची तिला आवड आहे. तिला दोन मुली असून तिचा पती कलाकार आहे. त्याने ‘बॅण्ड बाजा बारात`, ‘रब ने बना दी जोडी` अशा काही चित्रपटांत काम केले आहे. सन्मित कौर मूळची पंजाबची असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईत राहते. अमिताभ बच्चन यांनी एकापाठोपाठ एक प्रश्नं विचारले आणि तिने अगदी शांतपणे एकेका प्रश्नां ची उत्तरे दिली.

अंधेरीमध्ये गेल्या ४० वर्षांपासून आपण ज्या घरात भाड्यानं राहिलोय तेच घर विकत घ्याची इच्छा सन्मितनं कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलीय.

First Published: Tuesday, January 8, 2013, 08:00


comments powered by Disqus