`कॉमेडी नाईट्स`ची `गुत्थी` आता मिस `पम्मी`, Knights of Comedy `node`Now, Miss Pammi `

`कॉमेडी नाईट्स`ची `गुत्थी` आता मिस `पम्मी`

`कॉमेडी नाईट्स`ची `गुत्थी` आता मिस `पम्मी`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`कॉमेडी नाईट विथ कपिल` या कॉमेडी शोमधून `गुत्थी`चे काम करणारा सुनील ग्रोवर बाहेर पडल्याने या कार्यक्रमात ‘गुत्थी’ची उणीव भासत होती. आता याची जागा मिस `पम्मी` घेणार आहे.

मिस `पम्मी` ही नवीन गुत्थी या आठवडयातील कार्यक्रमात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत धम्माल करताना आणि आपला परीचय करून देताना ती दिसेल. पम्मी प्यारेलाल हे कॅरेक्टर साकारणा-या गौरव गेराला या कार्यक्रमात घेण्यात आले आहे.

कपिल शर्मा याच्यानंतर सर्वाना पोट धरून हसवणारे पात्र हे सुनील ग्रोवर गुत्थीच्या नावाने या शोमधून करीत होता. हे पात्र लोकांच्या चांगलेच पंसतीस उतरल्याने सुनील ग्रोवर याने पुढील शोसाठी अधिक पैशांची मागणी केली होती. सुनील ग्रोवरची मागणी फेटाळल्याने त्याने हा शो सोडला होता. आता नवी गुत्थी लोकांच्या किती पसंतीस उतरतेय, याकडे लक्ष लागले आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 27, 2013, 09:54


comments powered by Disqus