Last Updated: Tuesday, November 6, 2012, 16:52
www.24taas.com, मुंबईकलर्स टीव्हीवर सुरू असणाऱ्या बिग बॉस ६ या रिऍलिटी शोमध्ये पुन्हा वाद विवाद सुरू झाले आहेत. गेल्या आठवड्यात राजनीतीशी संबंधित टास्क दिल्यावर स्पर्धकांमध्ये जिंकण्या-हारण्यावरून वाद झाले होते. या आठवड्यात दिल्या गेलेल्या ‘मेजर साब की सेना’ या टास्कमुळे सिद्धू आणि व्रजेश हारजी यांच्यात भांडण सुरू झालं आहे.
या आठवड्यात दिलेल्या ‘मेजर साब की सेना’ या टास्कमध्ये सिद्धूला मेजर साब ठरवून त्याच्याकडे संपूर्ण टीमला हाताळण्याची सूत्रं दिली होती. सिद्धूने हे टास्क जास्तच गांभीर्याने घेत इतर स्पर्धकांकडून प्रचंड मेहनत करून घेतली. शारीरिक क्षमता तपासणीसाठी दिलेल्या कार्यात सिद्धूने सगळ्या स्पर्धकांना बराच वेळ धावायला लावलं. यामुळे वैतागलेल्या आणि थकलेल्या स्पर्धकांनी विरोध करायचा प्रयत्न केला. मात्र सिद्धूपुढे त्यांचं काहीच चाललं नाही.
धावताना सनाचा पायही मुरगळला, मात्र तकरीही सिद्धूचं मन द्रवलं नाही. त्यामुळे सिद्धूच्या जाचाला चिडून व्रजेश हार्जीने सिद्धूच्या धोरणांना विरोध करायला सुरूवात केली. त्यामुळे इतके दिवस धमाल करणारा व्रजेश आता गंभीर आणि आक्रमक भूमिकेत दिसू लागलाय. सिद्धूला छावणीचा मेजरक बनवण्यात आलंय, तर व्रजेशला सुभेदार नेमण्यात आलंय. वर्जेशने मात्र सिद्धूला विरोध केल्यामुळे मेजर सिद्धूने ब्रजेशचं कोर्टमार्सल करत त्याला घराबाहेर झोपण्याची शिक्षा दिली आहे.
सिद्धू आणि व्रजेश यांच्यात उडालेल्या ठिणगीची तक्रार व्रजेशने बिग बॉसकडेही केली आहे. यावर सिद्धूने व्रजेशला समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांच्यातील भांडण आता विकोपाला जाऊ लागलंय. तेव्हा घरातील इतर सदस्य आता त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
First Published: Tuesday, November 6, 2012, 16:51