'सीसीसी'मध्ये दिसणार मंदिरा-कपिलची धम्माल जोडी!, Mandira, Kapil to host CCL`s fourth season

'सीसीसी'मध्ये दिसणार मंदिरा-कपिलची धम्माल जोडी!

'सीसीसी'मध्ये दिसणार मंदिरा-कपिलची धम्माल जोडी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कॉमेडियन कपिल शर्माने सेलिब्रिटी क्रिकेट लीग होस्ट करण्यासाठी १.२५ करोड मागितले आहेत. कपिल हा खूप लोकप्रिय स्टार झाला आहे, आज तो सर्वात जास्त पैसे मिळवणारा कॉमेडियन आहे.

सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा हा चौथा सिझन आहे. कपिल सोबत टीव्ही एक्ट्रेस मंदिरा बेदीही असेल. हा क्रिकेट लीग सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

शर्माने हा लीगसाठी एक प्रोमो शूट केला आहे. या फोटोच्या पोस्टवर कपिलने लिहिलं आहे. सेलिब्रिट क्रिकेट लीग २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या लीगच्या ओपनिंग सेरेमनीला पॉप्यूलर रॅपर हनी सिंग परफॉर्म करणार आहेत.

बॉलीवूड अभिनेता रनदीप हुड्डा, आयुष्यमान खुराना, अरमान कोहली, समीर कोचर, अली जफर आणि जायद खान सारखे अभिनेते मैदाना उतरणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 16:39


comments powered by Disqus