अभिनेत्री प्राची मतेचे वयाच्या २३व्या वर्षी निधन, Marathi Actress prachi mate passes away

अभिनेत्री प्राची मतेचे वयाच्या २३व्या वर्षी निधन

अभिनेत्री प्राची मतेचे वयाच्या २३व्या वर्षी निधन
www.24taas.com, पुणे

`चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाल्याने मराठी सिनेसृष्टीत सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तिच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काल तिने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी प्राचीचे मंगळवारी पुण्यात बोनमॅरो कॅन्सरने निधन झाले. प्राचीचा कर्करोग अंतिम टप्प्यात असल्याचे गेल्या वर्षीच निदान झाले होते. प्राचीने मराठी सिनेसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटविला होता.

मुळची पुण्याची असणारी प्राची मराठी सिनेसृष्टीत नुकतीच स्थिरावली होती. मात्र एवढ्या कमी वयात प्राचीने घेतलेल्या अचानक एक्झिटमुळे कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.

First Published: Wednesday, February 20, 2013, 17:42


comments powered by Disqus