`इंडियाज गॉट टॅलेण्ट५`चा महाविजेता `नाद्योग ग्रुप` Naadyog group won india`s got talent

`इंडियाज गॉट टॅलेण्ट५`चा महाविजेता `नाद्योग ग्रुप`

`इंडियाज गॉट टॅलेण्ट५`चा महाविजेता `नाद्योग ग्रुप`

www.xee24taas.com, झी मीडीया, मुंबई

कलर्स चॅनेलवर प्रसारित होणारा कार्यक्रमाची `इंडियाज गॉट टॅलेण्ट सीजन ५` शनिवारी अंतिम महाफेरी पार पडली. या अंतिम महाफेरीत इंदूरच्या रागिनी मक्खर यांचा `नाद्योग ग्रुप` `महाविजेता` बनलायं.

महाविजेता `नाद्योग ग्रुप`ला ५० लाख रुपयांचा पुरस्कार, शानदार गाडी आणि पारितोषिक देण्यात आलयं. या नृत्य गटात १८ ते ३२ वयोगटांतील महिलांचा समावेश आहे.

`नाद्योग ग्रुप`ने महाअंतिम फेरीपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक फेरीत कथ्थक आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली कला सादर केली. आमच्या ग्रुपने तीन महिने चाललेल्या या कार्यक्रमासाठी २० तासांपेक्षा जास्त अभ्यास केलायं. कला, सराव आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आम्ही महाअंतिम फेरी जिंकण्यात सफल झालो असे, रागिनीने म्हटलयं.

महाअंतिमफेरीमध्ये महाअभिनेता अमिताभ बच्चन, जुही चावला आणि माधुरी दीक्षीत यांच्यासारख्या कलाकारांसमोर आमची कला सादर करायला मिळाली. म्हणून आम्ही खुपच खूश आहोत असे, रागिनीने सांगितलयं


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 10, 2014, 14:37


comments powered by Disqus