`मला सासू हवी` मध्ये नवे चेहरे

`मला सासू हवी` मध्ये नवे चेहरे

`मला सासू हवी` मध्ये नवे चेहरे
अनेक मालिकांमधून आपला ठसा उमटवणारे हरहुन्नरी अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे.. मात्र, कार अपघातात या दोघांनाही आपले प्राण गमवावे लागले.. अचानक त्यांची एक्झिट झाली.

‘मला सासू हवी’ ही त्यांची शेवटची मालिका.. मात्र, त्यांच्या या अचानक जाण्याने आता मालिकेतली आबांची आणि विघ्नेशची भूमिका कोण करणार हा प्रश्न सा-यांनाच पडला होता.. मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.. आबांच्या भूमिकेसाठी अभिनेते राजन भिसे तर विघ्नेशच्या भूमिकेसाठी अभिनेता आशिष कुलकर्णीची निवड करण्यात आली आहे.

या दोघांनाही आपण अनेक मालिकांमधून पाहिलंय.. दोघांनीही अनेक मालिकांमधून आपलं मनोरंजनही केलंय. त्यामुळे आता या राजन भिसे आणि आशीष कुलकर्णी यांची ही नवी इनिंग प्रेक्षक स्विकारतील का तेच पहायचं..

First Published: Wednesday, January 2, 2013, 22:33


comments powered by Disqus