`लाईव्ह फ्रॉम स्पेस`मध्ये पाहा संपूर्ण ब्रह्मांड!, now the whole world will seen in live from space

`लाईव्ह फ्रॉम स्पेस`मध्ये पाहा संपूर्ण ब्रह्मांड!

`लाईव्ह फ्रॉम स्पेस`मध्ये पाहा संपूर्ण ब्रह्मांड!

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आता, प्रेक्षकांना घरबसल्या कोणत्याही ग्रहावर सूर्यास्त आणि सूर्योदय, शहरातला प्रकाश, ताऱ्यांचं जग, कडाडत्या वीजा, वादळ यांचे अद्भूत अशी दृश्यं पाहता येणं शक्य होणार आहे. कारण, छोट्या पडद्यावर लवकरच `लाईव्ह फ्रॉम स्पेस` हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

टीव्हीवर दिसणारा दोन तासांचा हा कार्यक्रम इंटरनॅशनल स्पेस स्टेशनद्वारे घेतलेल्या फोटोंमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे.

शनिवारी पहिल्यांदाच एका टीव्ही चॅनलवर `कॉसमॉस : अ स्पेसटाईम ओडिसी` या कार्यक्रमाचं प्रदर्शन होणार आहे. यामध्ये ब्रह्मांडातील अद्भूत दृश्यं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 07:57


comments powered by Disqus