Last Updated: Monday, October 28, 2013, 16:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सध्या सर्वांच्या फेवरेट लिस्ट मध्ये अॅड झाला आहे. परफेक्ट कॉमेडी टाइमिंगसाठी प्रसिद्ध असलेला कपिल लग्न करत असल्याची बातमी सोशल नेटवर्कींग साइट्सवर शेअर करण्यात आली आहे. सर्वांना ही बातमी थोडी शॉकींगच होती. पण ही बातमी खरी आहे.
लवकरच कपिल, ‘भवनीत चतरथ’ हिच्याशी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. भवनीत चतरथ हिला, ‘हस बलिए’ या शोमध्ये वाइल्ड कार्ड द्वारा एन्ट्री मिळाली होती. या शोमुळे तीला खूप लोकप्रियता ही मिळाली. याच दरम्यान तीची भेट कपिलशी झाली. आणि ते प्रेमाच्या बंधात अडकले.
कॉमेडी नाइटचे ३६ भाग पूर्ण झाल्यानंतर कपिलचा लग्न करण्याचा विचार करणार आहे. कपिलच्या घरी या दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 28, 2013, 16:14