Last Updated: Monday, January 28, 2013, 10:38
www.24taas.com, मुंबई ‘झी टीव्ही’वर प्रसारित होणार लोकप्रिय संगीत कार्यक्रम ‘सा रे गा मा पा २०१२’चा खिताब पुण्याच्या मराठमोळ्या जसराज जोशीनं पटकावलाय.
रविवारी झालेल्या फायनलमध्ये जसराज आणि इतर स्पर्धकांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. हा फायनल सामना पाहण्यासाठी रसिकांनी तसंच सेलिब्रिटींनी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमात बाजी मारली ती जसराजनं... तर शहनाज अख्तर हा ‘रनर अप’ ठरला. सोबतच मोहम्मद अमननं तीसरा तर विश्वजीत बोरगावकरनं चौथा क्रमांक पटकावलाय.
या कार्यक्रमासाठी टीव्ही जगतातला कॉमेडी किंग कपिश शर्मानं लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. सोबतच इतर काही कलाकारांनीही या कार्यक्रमाला चार चाँद लावले. यामध्ये आपल्या गाण्यांवरून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पंजाबी रॅप गायक हनी सिंहचाही समावेश होता. उपस्थितांनी हनीच्या गाण्यांवरही ताल धरला होता.
First Published: Monday, January 28, 2013, 10:38