व्हॉट अ स्टार्ट: चुटकीचा पहिला गेस्ट सचिन?Sachin Tendulkar will be the first guest of Sunil Grover`s

व्हॉट अ स्टार्ट: चुटकीचा पहिला गेस्ट सचिन?

व्हॉट अ स्टार्ट: चुटकीचा पहिला गेस्ट सचिन?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कपिल शर्माचा प्रसिद्ध असा शो असलेल्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधील गुत्थी म्हणजेच अभिनेता सुनील ग्रोवर यानं अचानक गेल्या वर्षी कपिलचा शो सोडला. आता गुत्थी नव्या अवतारात, नव्या शोमधून पुढं येणार आहे. याच महिन्यात गुत्थी अर्थात सुनील ग्रोव्हरचा नवा कॉमेडी शो सुरू होणार आहे. यात सुनील ग्रोव्हर ‘चुटकी’ नावाची भूमिका साकारणार आहे.

येत्या १६ फेब्रुवारीपासून ‘मॅड इन इंडिया’ हा नवा शो घेऊन सुनील चाहत्यांच्या भेटीला येतोय. चुटकीच्या या शोची सुरुवात धडाक्यात होणार असून आपल्या पहिल्याच शोचा गेस्ट म्हणून त्यानं भारतरत्न सचिन तेंडुलकरला बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

कपिलचा शो रात्री १० वाजता आहे तर सुनीलचा शो हा साडे आठ वाजता असेल. या शोमध्ये विनोद, व्यंग आणि नाट्याचा समावेश करण्यात आला असून कपिलच्या शोपेक्षा थोडं वेगळेपण दाखविण्याचा सुनील आणि वाहिनीचा प्रयत्न आहे. ‘मॅड इन इंडिया’ या शोची टीम, सचिनला गेस्ट म्हणून या शोमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन या शोमध्ये येणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 6, 2014, 08:18


comments powered by Disqus