छोट्या पडद्यावर सलमान ठरतोय ‘महाग’!, salman khan getting highest income on small screen

छोट्या पडद्यावर सलमान ठरतोय ‘महाग’!

छोट्या पडद्यावर सलमान ठरतोय ‘महाग’!
www.24taas.com, मुंबई
बॉलिवूड स्टार सलमान खानचे हात सध्या ‘सातव्या आसमानावर’ पोहचलेत. सध्या त्याचं लक आणि त्याची लोकप्रियता त्याला चांगलीच साथ देतेय. नुकतंच, ‘एक था टायगर’ या त्याच्या सिनेमानं रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आणि आता सलमान खान छोट्या पडद्यावर सर्वात ज्यास्त मानधन घेणारा अभिनेता ठरलाय.

बॉलिवूडमध्येही सलमान खान सर्वात जास्त महागडा हिरो आहे. आता तर ‘बिग बॉस’सीझन-६ च्या निमित्तानं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकलाय. इथंही त्यानं कमाईच्या बाबतीत आपली ‘दबंगगिरी’ कायम ठेवलीय.

सलमान खाननं टीव्ही रिएलिटी शो बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्ये प्रति एपिसोड २.८ ते ३ करोड रुपयांचं मानधन घेतलं होतं. मात्र, यंदा बिग बॉस सीझन ६ साठी तो प्रति एपिसोड ३.८ ते ४ करोड रुपयांचं मानधन मिळवतोय.

बॉलिवूड कलाकारांच्या कमाईवर एक नजर टाकली तर लक्षात येतं की सलमान खान हा छोट्या पडद्यावर कसा महाग ठरतोय ते... आमिर खाननं ‘सत्यमेव जयते’साठी प्रति एपिसोड ३ रुपयांचं मानधन घेतलं होतं. शाहरुख खाननं टोटल वाईप आऊट आणि जोर का झटका – २ साठी प्रति एपिसोड २ करोड रुपयांचं मानधन घेतलं होतं तर कौन बनेगा करोडपती सीझन ५, ६, आणि ७ साठी अमिताभ बच्चन यांनी तब्बल १०० करोड रुपयांची डील साईन केल्याची माहिती मिळतेय. तर खतरों के खिलाडी साठी अक्षय कुमारनं प्रति एपिसोड १.५ करोड रुपयांचं मानधन मिळवलं होतं.

First Published: Monday, October 8, 2012, 11:26


comments powered by Disqus