‘बिग बॉस’चा न्यू सल्लू!, Salman Khan new look for big boss

‘बिग बॉस’चा न्यू सल्लू!

‘बिग बॉस’चा न्यू सल्लू!
www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खान लवकरच एका नव्या लूकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. फ्रेन्च बिअर्ड आणि स्टाईलिश हेअर असलेला सलमान खानचा नवीन लूक कुणालाही आवडेल असाच आहे.

सलमानचा हा लूक कोणत्याही सिनेमासाठी नाही तर बिग बॉसच्या आगामी सिझनसाठी आहे. खरं तर याआधी सलमान खान वेगवेगळ्या आणि हटके लूकमधून प्रेक्षकांसमोर आलाय. मग तो ‘तेरे नाम’चा राधे असो... ‘वीर’चा लढवय्या योद्धा असो… किंवा अगदी ‘दबंग’मधला चुलबूल पांडे. आपल्या लूकमुळे, स्टाईलमुळे सलमान नेहमीच चर्चेत राहिलाय आणि आता तर सलमान या कूल आणि डॅशिंग लूकमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. एवढचं नाही तर सलमानचा हा नवीन लूक स्मॉल स्क्रीनवर हंगामा करेल असं त्याची बहिण अल्विरा आणि डिझायनर अॅशले रेबेलो यांना वाटतंय. तेव्हा सिल्व्हर स्क्रीनप्रमाणेच सलमानचा हा लूक स्मॉल स्क्रीनवरही धमाका करेल, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

First Published: Tuesday, September 11, 2012, 09:33


comments powered by Disqus