Last Updated: Wednesday, December 19, 2012, 15:19
www.24taas.com, मुंबईराजला फक्त मीच नाचवू शकते... त्याला नाचवणं इतकं सोपं नाहीये... असं म्हणत शिल्पा शेट्टीने स्वत:च्या नवऱ्याबाबत नवं गुपीत सांगितलं आहे. शिल्पा आणि राज एकत्र नाचणार का? यावर प्रश्नावर शिल्पा शेट्टीने असं उत्तर दिलं आहे.
शिल्पा शेट्टी गेले अनेक दिवस इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र आता तिने झोकात पुनरागमन करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता ती आपल्याला लवकरच आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे. `नच बलिये ` यांच्या ५व्या पर्वात परीक्षक म्हणून शिल्पा काम पाहणार आहे. शिल्पाबरोबर टेरेन्स लुईस आणि साजिद खान या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत.
या शोचे परीक्षण कोणत्या गोष्टींवर आधारित असणार या प्रश्नावर शिल्पा म्हणाली की, माझ्यासाठी स्टाईल हा एक्स फॅक्टर राहणार असून स्पर्धकांची नृत्य करतानाची अदा मी बघणार आहे.
First Published: Wednesday, December 19, 2012, 14:14