नवज्योत सिंग सिद्धू बिग बॉसमध्ये परतणार.. , sidhu to return in big boss after gujrat elections

नवज्योत सिंग सिद्धू बिग बॉसमध्ये परतणार..

नवज्योत सिंग सिद्धू बिग बॉसमध्ये परतणार..
www.24taas.com, मुंबई

भाजपचे आमदार असलेल्या नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी फोन केल्यानंतर सिद्धूला बिग बॉस मधून बाहेर पडावं लागलं होतं. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपला सिद्धूची गरज असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं

पण नवज्‍योतसिंग सिद्धू `बिग बॉस`मध्‍ये परतणार आहे. पक्षाच्‍या आदेशानुसार सिद्धू शोमधुन बाहेर आला. परंतु, हा केवळ मध्‍यांतर असून फिल्‍म अभी बाकी है, अशी प्रतिक्रीया त्‍याने दिली आहे.

सिद्धू गुजरातच्‍या निवडणुकीनंतर शोमध्‍ये परतणार आहे. त्‍याला गुजरात प्रचारात सहभागी व्‍हायचे आहे. प्रचार झाल्‍यानंतर तो पुन्‍हा `बिग बॉस`मध्‍ये दिसेल. जवळपास महिनाभर सिद्धू `बिग बॉस`मध्‍ये होता. परंतु, पक्षाने बाहेर पडण्‍याचा आदेश दिल्‍यानंतर तो बाहेर आला.

First Published: Wednesday, November 14, 2012, 11:59


comments powered by Disqus