सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट Sunny Leone to replace Sherlyn Chopra in MTV

सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट

सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एमटीव्हीच्या `वेब्ड` आणि `हॉन्टेड वीकेन्ड्स` या शोला होस्ट केल्यानंतर सनी लिओन आता रिअॅलिटी शो `स्प्लिट्सविला`च्या सातव्या सीझनला होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे सनीनं शर्लिनच्या हातून हा शो हिरावून घेतलाय. कारण मागील सीझन शर्लिननं होस्ट केलं होतं.

अमेरिकेतील रिअॅलिटी शो `फ्लेवर ऑफ लव्ह`चं हिंदी रूप म्हणजे `स्प्लिट्सविला`. या शोमध्ये प्रेमाच्या शोधात निघालेल्या तरुण-तरुणींना एका व्हिलामध्ये ठेवलं जातं. प्रत्येक आठवड्याला त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात. यादरम्यान शोमध्ये उपस्थित असलेल्या स्पर्धकांसोबत त्यांना जोडी बनवावी लागते.

शोच्या शेवटी जी जोडी जिंकते त्यांना पुरस्कार मिळतो. जोडीतल्या दोन्ही व्यक्तींमध्ये ती रक्कम वाटली जाते. शोची तारीख आणि स्पर्धकांबाबत चॅनलच्यावतीनं काही माहिती दिली गेली नाहीय. कॅनडातील पॉर्नस्टारम्हणून काम केलेली आणि बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली अभिनेत्री सनी लिओननं सुरुवातच रिअॅलिटी शोमधून केली. बिग बॉस 5मध्ये तीही एक स्पर्धक होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 16:38


comments powered by Disqus