Last Updated: Sunday, January 19, 2014, 19:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा विवाह यापूर्वीच झाल्याची चर्चा होत आहे. आपल्या लीव्ह-इन-रिलेशनला होणाऱ्या कौटुंबिक विरोधामुळे त्यांनी यापूर्वीच लग्न केल्याचं सुत्रांकडून समजतंय.
आपल्या करीअरच्या दृष्टीकोनातून त्यांनी ही गोष्ट मीडीयापासून दूर ठेवली. मात्र आपण लीव्ह-इन-रिलेशनमध्ये असल्याचे ते यापूर्वीही मान्य करत होते.
सुशांत आणि अंकीताची पवित्र रिश्ताच्या सेटवर सुरु झालेल्या प्रेमप्रकरणाची परीणीती लग्नात झाली आणि त्यांचे शुभमंगल इंदूरला पार पडल्याची चर्चा आहे.
एप्रिलमध्ये हा ‘शुद्ध देसी रोमांस’ ते फॅन्ससमोर जाहीर करतील. पाच वर्षापासून असलेले प्रेमप्रकरण, लीव-इन-रिलेशनला दिलेली कबुली, आणि लग्न झाल्याच्या चर्चा आता ते मान्य कधी करतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 19, 2014, 18:59