Last Updated: Monday, December 2, 2013, 12:08
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली रिअॅलिटी शो ‘बीग बॉस सीझन – ७’मध्ये सध्या सगळ्याच स्पर्धकांचा कार्यक्रमात जोरदार तडका बसताना दिसतोय. याच दरम्यान, एका इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेली एका मोठ्या घरातून आलेली स्पर्धक सगळ्यात जास्त कमाई करणारी स्पर्धक आहे.
होय, तुमचा अंदाज बरोबर आहे. ही स्पर्धक म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री काजोलची बहिण आणि अभिनेत्री तनुजा यांची छोटी मुलगी तनिषा मुखर्जी आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कार्यक्रमाचे निर्माते तनिषासाठी सर्वांत जास्त रक्कम मोजत असल्याचं उघड झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी तनीषाला एका आठवड्यासाठी ७.७ लाख रुपये मिळतात. तनिषाच्या पाठोपाठ नंबर आहे तो गौहर खानचा...
एक नजर टाकुयात या कार्यक्रमात कुणा-कुणाला किती मेहताना मिळतोय यावर... तनिषा मुखर्जी – एका आठवड्यासाठी ७.७ लाख रुपये
गौहर खान – एका आठवड्यासाठी सहा लाख रुपये
अरमान कोहली - एका आठवड्यासाठी पाच लाख रुपये
कुशाल टंडन - एका आठवड्यासाठी पाच लाख रुपये
काम्या पंजाबी एका आठवड्यासाठी चार लाख रुपये
संग्राम सिंग - एका आठवड्यासाठी साडे तीन लाख रुपये
प्रत्युषा बॅनर्जी - एका आठवड्यासाठी साडे तीन लाख रुपये
व्हीजे अँडी - एका आठवड्यासाठी तीन लाख रुपये
न्यूड योगा गुरू विवेक मिश्रा एका आठवड्यासाठी तीन लाख रुपये
मॉडल एजाज खान - एका आठवड्यासाठी अडीच लाख रुपये
सोफिया ह्यात - एका आठवड्यासाठी दीड लाख रुपये
एली अबराम - एका आठवड्यासाठी ७५,००० ते एक लाख रुपये
याचाच अर्थ तनिषा आणि गौहरनं आपल्या ‘सो-कॉल्ड’ बॉयफ्रेंडसना कमावण्याच्या बाबतीत केव्हाच मागे टाकलंय. सध्या या रिअॅलिटी शोमध्ये गौहर खान, कुशाल टंडन, तनिषा मुखर्जी, अरमान, संग्राम, अँडी, काम्या पंजाबी, एजाज खान आणि सोफिया स्पर्धेत कायम आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 28, 2013, 18:40