श्री आणि जान्हवीचं पुण्यात लग्न , Tejasri Pradhan & Shashank Ketkar`s marriage on 8 February

श्री आणि जान्हवीचं पुण्यात लग्न

श्री आणि जान्हवीचं पुण्यात लग्न
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जान्हवी आणि श्री अर्थात तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. त्यांचे पुण्यात होणार आहे. आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यात दोघांची धावपळ उडाली आहे. त्यांनी निमंत्रण पत्रिका देताना लग्न प्रवेशिकाही सोबत देत आहेत. कोणत्याही गोंधळ होऊ नये, त्यांनी ही खबरदारी घेतलीय.

तुमच्याकडे लग्न पत्रिका असेल आणि प्रवेशिका नसेल तर लग्न समारंभात तुम्हाला सहभागी होता येणार नाही. विवाहसमारंभाला होणारी गर्दी लक्षात घेता त्यांनी ही अट घातली आहे. सध्या झी टीव्हीवरील `होणार सून मी या घरची` ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे. यातील श्री आणि जान्हवीची जोडीही हीट झाली आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना सुखद धक्का देणारी आहे.

बॉलिवूड तारे-तारकांप्रमाणेच मराठी कलाकारांची क्रेझही आता जबरदस्त वाढली आहे. प्रेक्षक या जोडीला भेटण्यासाठी खूप आतुर असतात. हे दोघेजण लग्न करतायत अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. परंतु दोघांनीही मात्र त्यावर मौन बाळगले होते. आता तर त्यांचे लग्न कोठे होणार आहे ते समजले आहे. हे दोघे पुण्यात फेब्रुवारीमध्ये लग्न करीत आहेत. त्यांच्या लग्नसमारंभाच्या निमंत्रणपत्रिकाही वाटल्या जातायत. पत्रिका देतानाच त्यासोबतच माणशी एक अशी प्रवेशिकाही त्यांनी दिली आहे. विवाहसमारंभाला येणाऱ्या प्रत्येकाला ती प्रवेशिका असणं बंधनकारक असेल.

लग्नासाठी आमंत्रण दिलेल्यांना एक पत्रिका आणि त्यांच्या घरातून येणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रवेशिका देण्यात आली आहे. तसंच रिसेप्शनच्याही प्रवेशिका देण्यात आल्या आहेत. दोघांनीही लग्नासाठी सलग मोठी सुट्टी घेतली नाहीय. शुटिंग सांभाळतच दोघे लग्नाच्या तयारीला लागले आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 16, 2014, 12:20


comments powered by Disqus