नारायणीचा नवा डाव - Marathi News 24taas.com

नारायणीचा नवा डाव

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
'पिंजरा' ही मालिका सध्या इन्ट्रेस्टिंग वळणावर आलीय. वीर आणि आनंदीचं लग्न मोडावं यासाठी अक्काचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यातच आता एक मोठा ट्विस्ट आलाय.
 
वीर-आनंदीच्या साखरपुड्याच्या बातमीने शेलार वाड्यात सारेच आनंदात आहेत. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. मात्र, सारं काही नीट झालं तरं ती मालिका कसली. मालिकेत काहीतरी मेलोड्रामा हवाचं ना? अगदी तसाच मेलोड्रामा घडलाय पिंजरामध्ये. कारण, इथे नारायणी खेळलीय एक नवी खेळी. मात्र, नारायणीच्या या खेळीला आनंदी आणि शालिनीनेही चोख प्रत्युत्तर दिलंय. आपला डाव फसल्याचं कळताच नारायणीलाही धक्का बसलाय. त्यामुळे कबीरच्या मदतीने वीर-आनंदीचं लग्न मोडण्याचा आक्काचा डाव यापुढे काय नवीन वळण घेणार ते लवकरच पाहायला मिळेल.

First Published: Friday, December 2, 2011, 11:23


comments powered by Disqus