'रावडी राठोड'च्या मदतीला 'सीआयडी' - Marathi News 24taas.com

'रावडी राठोड'च्या मदतीला 'सीआयडी'

www.24taas.com, मुंबई
 
सीआयडी मालिका गेली कित्येक वर्षं टीव्हीवर किती गाजतेय हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या मालिकेतली पात्रं, त्यांचे संवाद आता लोकांना पाठ झाले आहेत. इतकंच नव्हे, तर त्यावर कित्येक जोक्सही प्रसिद्ध झाले. अशा गाजलेल्या सीआयडीची मदत अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हालाही लागली. ‘रावडी राठोड’ सिनेमाचं प्रमोशन करायला अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा ‘सीआयडी’मध्ये आले होते. लवकरच हा भाग टीव्हीवर पाहायला मिळेल.
 
बहुचर्चित 'रावडी राठोड' या सिनेमात अक्षय कुमार पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारतोय. म्हणूनच आपल्या सिनेमाचं प्रमोशन करायला रावडी राठोड थेट सीआयडीमध्ये पोहोचला. आपल्या सिनेमाचं प्रमोशन स्मॉल स्क्रीनवर करणं अत्यंत गरजेचं असल्याचं मतही यावेळी अक्षय कुमारने मांडलं..
 
आता या रावडी राठोडने सीआयडीच्या मदतीने गुन्हेगारांना कसं पडकलंय हे कळण्यासाठी सीआयडीचा रावडी राठोड स्पेशल एपिसोड पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

First Published: Wednesday, May 23, 2012, 11:43


comments powered by Disqus