'एका लग्नाची दुसरी गोष्ट' घना-राधा प्रेमात? - Marathi News 24taas.com

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' घना-राधा प्रेमात?

 www.24taas.com
 
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेत सध्या प्रेमाचं वारं वाहतं आहे. लग्नाचं खोटं नाटक करता करता घनश्याम आणि राधा खरंच प्रेमात पडले आहेत.  घनश्यामची तब्बेत बरी नसल्यानं राधा अगदी मनापासून घनश्यामची काळजी घेते आहे.
 
खरं तर लग्न, प्रेम या सगळ्याच्या विरोधात असलेले घना आणि राधा हळुहळु एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत असंच दिसतं आहे. एकमेकांपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेल्या घना आणि राधामधली ही भींत कधी मोडून पडते हे त्या दोघांनाही समजत नाही.
 
त्यामुळे आता घना-राधाचं नातं काय वळण घेणार? ते दोघही खरंच एकत्र येणार का? याची उत्सुकता निश्चीतच वाढली आहे. पण सध्या तरी मालिकेत आलेला हा रोमॅण्टिक ट्रॅक आपण एन्जॉय करुया.
 
 
 

First Published: Thursday, May 24, 2012, 19:58


comments powered by Disqus