स्टार अँड रॉकस्टार... धनुष - Marathi News 24taas.com

स्टार अँड रॉकस्टार... धनुष

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
अत्यंत कमी कालावधीत धनुष हे नाव आणि कोलावरी डी हे साँग जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिध्द झालंय आणि त्यामुळे सध्या तमिळच्या सुपरस्टारला भरपूर डिमांड आहे. कॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूड, टेलिव्हिजनही धनुषच्या प्रेमात आहे. आणि म्हणूनच हे गाणं धनुष अवतरला तो 'स्टार या रॉकस्टार'च्या सेटवर.
 
सध्या वर्ल्ड फेमस असलेल्या रॉकस्टार धनुषने कपिल, मानसी आणि सचिन यांच्यातलं स्टार या रॉकस्टार हे युध्द अगदी रंगात असतानाच  'स्टार या रॉकस्टार'च्या सेटवर हजेरी लावली. अर्थात ही हजेरी नुसतीच नव्हती तर यावेळी खास या रॉकस्टारने आपलं सध्याचं हिट आणि वर्ल्ड फेमस साँग 'कोलावरी डी' ची झलकही दाखवली.विशेष म्हणजे हा धनुषचा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स होता. आपल्या या यशाबद्दल धनुष अगदी भरभरून बोलला.
 
 

First Published: Tuesday, December 6, 2011, 07:55


comments powered by Disqus