Last Updated: Tuesday, December 6, 2011, 10:51
झी २४ तास वेब टीम, मुंबई डान्स इंडिया डान्सचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा मास्टर गीता, टेरेन्स, रेमो आणि मिथुनदा यांची धमाल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
'डान्स इंडिया डान्स'च्या सिझन वन, सिझन टू ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. स्टंट्स, एरिअल ऍक्ट, अफलातून सादरीकरणाने अल्पावधीतच डीआयडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं.. आणि आता तोच जलवा, तीच धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. कारण, डान्स इंडिया डान्सचा तिसरा सिझन लवकरच भेटीला येतोय.
मास्टर रेमो, गीता कपूर, टेरेन्स पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आणि जोडीला ग्रॅन्डमास्टर मिथुन दांचं मार्गदर्शनही असेलंच. जगभरातून जबरदस्त टक्कर देणारे १८ स्पर्धक नव्या पर्वात दिसणार आहेत.
First Published: Tuesday, December 6, 2011, 10:51