Last Updated: Wednesday, June 6, 2012, 12:35
www.24taas.com 
राधा घनाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित आजवर कुणालाच माहित नव्हंत.. मात्र आता राधानं हा गौप्य स्फोट केला आहे.. कुणा समोर आणि कसा केला गौप्यस्फोट राधाने?
राधा घरी गेल्यानंतर काळे कुटुंबात सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे तो घना आणि राधमध्ये नेमकं काय बिनसलं आहे. दिग्या आणि उल्का यावर एकमेकांशी बोलतात. मात्र या वरुन घना राधात नक्कीच काहीतरी वेगळी डाळ शिजत असल्याचा निष्कर्ष निघतो..
तर दुसरी कडे प्रॅक्टीकल वागणारे घना राधा इमोशनल झाल्यानं त्यांचा चांगलाच गुंता झाला आहे. हा गुंता सोडवण्यासाठी घना विनोद काकाला बोलवतो आणि चक्क हे सिक्रेट त्याच्याशी शेअर करतो. आता घनाचं हे सिक्रेट विनोद काकाला कळल्यानंतर तो तरी या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या गुंत्यातून राधा घनाला सोडवू शकतोय का हेच पहायचं आहे..
First Published: Wednesday, June 6, 2012, 12:35