एका पेक्षा एक...कॉलबॅक - Marathi News 24taas.com

एका पेक्षा एक...कॉलबॅक

झी २४ तास वेब टीम
 
एका पेक्षा एकच्या मंचावर या आठवड्यात रंगणार आहे कॉलबॅक राऊंड. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धक जोड्यांना आपल्यातलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाणार आहे.
 
अप्रतिम सादरीकरण, एकसे एक परफॉर्मन्स आजवर आपल्याला एका पेक्षा एकच्या मंचावर पहायला मिळाले. आणि आता तर ही स्पर्धा आणखीनच रंगतदार झाली आहे. मात्र, या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार आहे एक सरप्राईज ते म्हणजे या स्पर्धेतून एलिमिनेट झालेल्या आपल्या फेव्हरेट जोडीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे.
 
कारण, या आठवड्यात रंगणार आहे कॉलबॅक राऊंड. कॉलबॅक राऊंडमध्ये जमके परफॉर्मन्स देऊन स्पर्धेत पुन्हा एकदा एन्ट्री घेण्यासाठी हे स्पर्धकही सरसावलेत. आपल्यातंल बेस्ट देण्याचा प्रत्येक जोडी प्रयत्न करत आहे त्यामुळे आता कॉलबॅक राऊंडमध्ये कोणती जोडी बाजी मारणार याचीच उत्सुकता आहे...

First Published: Tuesday, December 6, 2011, 18:25


comments powered by Disqus