एकता कपूर काय नवीन करणार? - Marathi News 24taas.com

एकता कपूर काय नवीन करणार?

www.24taas.com, मुंबई
 
एकता कपूर नेहमीच काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत असते. आताही ती असचं काही तरी नवं घेऊन येते आहे. एकता कपूरने छोट्या पडयाद्यावर आपला ठसा उमटवल्यानंतर आता ती काही नवं करीत आहे.
 
मुंबई आणि दिल्ली येथे मीडिया स्कूल चालू केल्यानंतर चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांनी त्यांच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एक्सलन्स’ या मीडिया स्कूलची बंगळुरू येथे शाखा उघडण्याचे निश्‍चित केले आहे.
 
मुंबईतील स्कूलमध्ये येणार्‍या अर्जांपैकी १५ टक्के अर्ज दक्षिणेतील अस्लायने बंगळुरू येथे शाखा काढण्याचे निश्‍चित केल्याची माहिती ‘आयसीई’चे सीईओ अनुराग गुप्ता यांनी दिली. या स्कूलमध्ये अभिनय, मॉडेलिंग, दिग्दर्शन, संकलन, संहितालेखन, ध्वनी आणि सिनेचित्रीकरण या विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
 
 
 
 
 
 

First Published: Saturday, June 9, 2012, 16:50


comments powered by Disqus